आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाकरे सरकारने पुन्हा एकदा प्रभागरचनेत बदल केला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने त्यावेळी घेतलेल्या बहुसदस्यीय प्रभागपद्धतीला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी विरोध केला होता. आता मात्र महाविकासआघाडी ने पुन्हाएकदा तोच निर्णय घेतलाय. महा विकास आघाडी सरकार वरती ही विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केलाय.