Special Report Walmik Karad : चर्चेतला एन्काऊंटर आरोपांचा काऊंटर, सरकार अॅक्शन मोडवर

Continues below advertisement

Special Report Walmik Karad : चर्चेतला एन्काऊंटर आरोपांचा काऊंटर, सरकार अॅक्शन मोडवर

 बीडमधील सरपंच हत्याप्रकरणानंतर बीडमध्ये (Beed) राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या सत्तेच्या गैरवापराबाबत विरोधकांनी आवाज उठवला आहे. आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यात छोटे आका व मोठे आका यांची दहशत असल्याचे सांगत येथील पोलीस व प्रशासनात सगळे ह्या नेत्यांचेच अधिकारी असल्याचं म्हटलं होतं. तर, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali damania) यांनी देखील हे प्रकरण सुरुवातीपासून लाऊन धरलं आहे. याप्रकरणातील आरोपींना अटक करुन कडक कारवाई करावी, या मागणीसह बीडमध्ये वाल्मिक कराडची असलेली दहशत सरकारने मोडून काढावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. आता, बीडमध्ये एका विशिष्ट समाजाचेच अधिकारी का आहेत, असा सवाल उपस्थित करत अंजली दमानिया यांनी परळीतील तहसीलदार, पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी यांची नावेच जाहीर केली आहे. त्यामुळे, आता पुन्हा एकदा बीडमध्ये जातीय समीकरण कसं हाताळलं जातं हे समोर आलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram