Special Report : Suresh Dhas यांच्या आरोपांना बीडमधील जातीय समीकरणांची किनार?

Continues below advertisement

Special Report : Suresh Dhas यांच्या आरोपांना बीडमधील जातीय समीकरणांची किनार?

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Sarpanch Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय. देशमुख यांच्या हत्येचा तपास महाराष्ट्र पोलिसांकडून आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आला असून सीआयडीने अनेकांची चौकशी सुरु केली आहे. दरम्यान, या प्रकरणात गंभीर आरोप होत असलेले वाल्मिक कराड (Walmik Karad) फरार आहेत. वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचाही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याही प्रकरणात ते अद्याप फरार असल्याने त्यांच्या शोध घेण्यासाठी सीआयडीने वाल्मिक कराड (Manjili Karad) यांच्या पत्नी मंजिली कराड यांची चौकशी केली आहे. वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात. 

खंडणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड फरार असल्याने पत्नीची सीआयकडून चौकशी 

अधिकची माहिती अशी की, वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा आहे. खंडणीच्या गुन्हा प्रकरणात सध्या वाल्मिक कराड फरार आहेत. दरम्यान, सीआयडीने वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांची चौकशी केली आहे. बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये जिथे सीआयडीचं पथक सकाळपासून काम करत आहे. त्यांनी दोन ते अडीच तास मंजिली कराड यांची चौकशी केली आहे. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलंय. गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड फरार होते, त्यानंतर  त्यासंदर्भातील चौकशीचा भाग असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram