Special Report Saif Attacker : सैफचा सीसीटीव्हीतील आणि अटकेतील हल्लेखोर एक नाही?

Continues below advertisement

Special Report  Saif Attacker : सैफचा सीसीटीव्हीतील आणि अटकेतील हल्लेखोर एक नाही?

Saif Ali Khan Stabbing Case: बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सैफ अली खानवर (Saif Ali Khan) 16 जानेवारी रोजी चोरट्यानं घरात घुसून चाकूहल्ला केला. या हल्ल्यात सैफ अली खानला गंभीर दुखापत झाली होती. सैफवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादला (Mohammad Shahzad) पोलिसांनी अटक केली आहे. सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे, त्याच्या चौकशीतून दररोज नवनवे खुलासे होत आहेत. शरीफुल बांगलादेशातून पळून भारतात आला होता, अशी माहिती त्यानं पोलिसांना दिली. अशातच आता शरीफुलचे वडील रुहुल अमीन फकीर यांनी एबीपी न्यूजसोबत एक्स्लुझिव्ह बातचित केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच, शरीफुलनं केलेले अनेक दावे त्याच्या वडिलांनी फेटाळून लावले. 

शरीफुलनं तो अवैधरित्या बांगलादेशहून भारतात पळून आल्याचं सांगितलं होतं. त्याच्या वडिलांनी ही शरीफुल कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय भारतात आला होता, असं सांगितलं. तसेच, शरीफुल कधीही कुस्तीगीर नव्हता असंही त्यांनी सांगितलं. आरोपी शरीफुलचे वडील काय म्हणाले?

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram