ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 24 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 24 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

वेळ आली की स्वबळाचा निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंकडून आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत...कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेणार असल्याचंही केलं स्पष्ट...

जखमी वाघ कसा पंजा मारतो हे तुम्हाला कळेल, ठाकरेंना जागा दाखवली म्हणणाऱ्या अमित शाहांना उद्धव ठाकरेंचं उत्तर...मोदींवरही हल्लाबोल...पण संपूर्ण भाषणात फडणवीसांवर टीका नाही...

कोणत्याही खुर्चीपेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा, शिवसेनेच्या मेळाव्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य...आपण डीसीएम म्हणजे डेडिकेटेड कॉमन मॅन असल्याचाही पुनरुच्चार ...

अमित शाह आज महाराष्ट्रात, मालेगावात छगन भुजबळांसह एकाच व्यासपीठावर तर मुख्यमंत्र्यांशिवाय एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबत बैठक 

बनावट नोटा प्रकरणातल्या सनी आठवलेनं समोर आणली वाल्मिक कराड आणि पोलिसांची ऑडिओ क्लिप...मात्र पोलिसांकडून ऑडिओ क्लिपचं खंडन...कराडने खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा सनीचा आरोप...

सैफ हल्ला प्रकरणात मोठी अपडेट समोर, आरोपीच्या बोटांचे ठसे सैफच्या घरी सापडलेल्या बोटांच्या ठशांशी जुळतात, फॉरेन्सिक तपासणीत उघड, तर सैफच्या वैद्यकीय अहवालानुसार आरोपीवर बीएनएसचे कलम १०९ लावता येणार नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram