Special Report Priyanka Gandhi Bag:संसदेत 'बॅग पॉलिटिक्स' प्रियांका गांधींच्या बॅगवरुन चर्चा रगंली

Continues below advertisement

Special Report Priyanka Gandhi Bag:संसदेत 'बॅग पॉलिटिक्स' प्रियांका गांधींच्या बॅगवरुन चर्चा रगंली
हे ही वाचा...

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वीसंध्येला संपन्न झाला असून पुढील दोन दिवसांत जागावाटप देखील होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेतून माहिती देताना सांगितले. मात्र, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देत, अनेक दिग्गजांना डावलण्यात आलं आहे. त्यामध्ये, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 5 वरिष्ठ नेत्यांना मंत्रीपदातून वगळले आहे. तर, भाजपनेही शिंदे सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या 4 नेत्यांचा पत्ता कट केला आहे. त्यामध्ये, भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि रविंद्र चव्हाण यांचाही समावेश आहे. मात्र, रविंद्र चव्हाण यांना भाजपकडून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. मग, सुधीर मुनगंटीवार यांचं काय होणार, सुधीर मुनगंटीवारांना नेमकं कशामुळे मंत्रिपद नाकारण्यात आलं, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच, काल(16 डिसेंबरला) सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) हे भाजपचे वरिष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या भेटीला गेले होते. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये दीडतास चर्चा झाली असून त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. दरम्यान त्या भेटीनंतर आता उच्चपदस्थ नेत्यांमध्ये मोठ्या हालचाली केली जात असल्याची चर्चा आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram