Special Report prajakta vs Suresh Dhas :प्राजक्ता दुखावली, रडली मात्र सुरेश धसांचा माफी मागायला नकार

Continues below advertisement

Special Report prajakta vs Suresh Dhas :प्राजक्ता दुखावली, रडली मात्र सुरेश धसांचा माफी मागायला नकार

 भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमधील पत्रकार परिषदेत मंत्री धनंजय मुंडेंवर टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटलंय. प्राजक्ता माळी हिने आज मुंबईत पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांचा निषेध नोंदवत त्यांनी माफी मागावी असं म्हटलंय. तर करुणा शर्मा (Karuna Sharma) यांना देखील नोटीस पाठवली, असल्याचे प्राजक्ता हिने सांगितलंय. दरम्यान, प्राजक्ता माळी (Prajakta Mali) आणि सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यातील वादात आता अभिनेते आणि शिरुरचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी भाष्य केलंय. ते एबीपी माझाशी बोलत होते. 

अमोल कोल्हे म्हणाले, त्यांच्यासंदर्भात वाद होईल असं वाटले नव्हते. वाद निर्माण झाला नसता तर बरं झाले असते. सुरेश धस यांचे यांचे स्टेटमेंट हे इव्हेंटसंदर्भात होते..त्यांच्या विधानाला ट्विस्ट करण्याची गरज नाही. सुरेश धस यांच्याकडून शिंतोडे उडवायचा प्रयत्न झाला नाही..धस यांचे स्टेटमेंट हे क्लियर आहे, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी सुरेश धस यांची बाजू घेतली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram