Butterfly | आंबोलीतलं फुलपाखरांचं अद्भुत | ABP Majha
Continues below advertisement
जैवविविधतेने संपन्न अश्या आंबोलीत महाराष्ट्रात आढळणाऱ्या फुलपाखरांची सर्वात जास्त विविध प्रकारची फुलपाखरं पाहायला मिळतात. राज्यातील २७८ पैकी २१० प्रकारची फुलपाखरे आंबोलीत आढळून आली आहेत. १९२७ सालापासून ब्रिटिशानिही आंबोलीत फुलपाखराच्या नोंदी केलेल्या आढळतात. हिमालयानंतर पश्चिम घाटात आंबोली हाच जैवविविधतेचा हॉटस्कॉट आहे. सावंतवाडी संस्थानचे राजे श्रीमंत बापूसाहेब महाराजानी आंबोलीत जैवविविधतेच्या संरक्षणासाठी संस्थान काळात संरक्षित वन घोषित केले होते. भारतात एकूण १३२० फुलपाखरं आढळतात. पावसाळा संपला कि फुलपाखरांचा हंगाम सुरु होतो. सप्टेंबर ते मार्च पर्यत फुलपाखरं आंबोलीत पाहायला मिळतात. फुलपाखराचं आयुष्य हे ४० दिवसापासून ४ महिन्यापर्यंत असत. स्तलांतरित फुलपाखर आंबोलीत तीन ते चार प्रकारची सापडतात. त्याची संख्या हजारोंच्या संख्येने असते. त्यामध्ये ब्लु टायगर, कॉमन क्रो, डार्क ब्लु टायगर या प्रजातीची फुलपाखर स्थलांतरित आंबोलीत सापडतात.
Continues below advertisement