Special Report | कष्टाच्या पाण्यात कुणी विष कालवलं? | सातारा | ABP Majha
दुष्काळ... मराठवाड्यासह सातारा जिल्ह्यातील माण-खटाव तालुक्याच्या पाचवीलाच पुजलेला. मात्र, या दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारसह काही संस्था गेल्या काही वर्षांपासून झटत आहेत. पाणी फाऊंडेशन या संस्थेनं खटाव तालुक्यातील गोपूज गाव पाणीदार केलं. पण एका साखर कारखान्यानं या पाण्यात विष कालवल्याचा आरोप होतोय. काय केलं या कारखान्यानं आणि काय आहे गोपूज वासियांची व्यथा... जाणून घेण्यासाठी पाहूया एबीपी माझाचा हा रिपोर्ट