Special Report | दोन राजे.... नेहमीच वाजे! साताऱ्यात रंगलय पोस्टर वॉर
सातारचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्राराजे भोसले यांच्यात कायमच धुसपुस होताना पहायला मिळत असते. त्यात कधी राजकीय वाद तर कधी टेंडरवरून वाद. तर कधी विकास कामांच श्रेय. या ना त्या कारणातून होणारे वादाचे पडसाद म्हणजे ग्राऊंडलेवलला काम करणाऱ्या बिचाऱ्या कार्यकर्त्यांची डोकी फुटने, वार होणे, एकमेकांवर गुन्हे दाखल होणे. आणि अनेकवेळेला तर यांच्या वादातून संपुर्ण सातारची बाजारपेठच बंद पडते. असे असताना आता नगरपालिकेच्या निवडणुकीची हळूहळू डबडी वाजायला लागली की, या दोघांमध्ये पुन्हा वादाच्या ठिणग्या पडायला सुरवात झाली.