Special Report | दाऊदचं पाकिस्तानी मॉड्युल फेल! दाऊद... पुन्हा रक्तपात घडवणार होता?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Sep 2021 10:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदाऊद इब्राहिम म्हणजे मुंबईचा जुना शत्रू. याच दाऊदनं मुंबईवर वक्रदृष्टी टाकल्यनं आता तपास यंत्रणांची झोप उडाली आहे. मुंबई आणि दिल्लीत घातपाताचा कट आखणाऱ्या सहा दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यापैकी एका दहशतवाद्याचं मुंबईतील सायन परिसरात वास्तव्य होतं, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. जान मोहम्मद अली शेख, असं अटक करण्यात आलेल्या मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या दहशतवाद्याचं नाव आहे. महाराष्ट्रातील दहशतवादी विरोधी पथकानं काल जान मोहम्मदच्या घरी जाऊन तपास सुरु केला आहे. तसेच त्याच्यासोबत राहत असलेल्या साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे.