Special Report | परदेशी सोयाबीनची आयात भोवली, केंद्राच्या धोरणाचा सोयाबीन उत्पादकांना फटका
आधी पावसानं दिलेला ताण , त्यानंतर अचानक झालेली अतिवृष्टी , आणि आता सोयाबीनला शेंगा तर लागल्या मात्र शेंगात दाणेच भरले नाहीत .. सरकारी बाबूंनी या गावात अतिवृष्टी किंवा नुकसान झालंच नसल्याचा अहवाल वरिष्ठाना सादर करून आपले हाथ वर केलेत..सरकारी बाबूंच्या अनास्थेमुळं सोयाबीन उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात . लातूर जिल्ह्यात सोयाबीन पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात होतो . नगदी पीक असल्यानं शेतकरी सोयाबीनवर भरवसा ठेऊन पुढचं गणित मांडतात . मात्र यावर्षी ऐन फुलधारणेच्या वेळेत पावसानं ओढ दिली . त्यानंतर सलग आठ दिवस पावसानं झोडपलं . याचा परिणाम सोयाबीन पिकावर झाला . सोयाबीनला शेंगा तर लागल्या मात्र शेंगात दाणेच भरले नाहीत . यामुळं शेतकरी आता संकटात सापडलाय
Tags :
Special Report Soybean Crops