Special Report Congress : अशोक चव्हाणांचा काँग्रेसला रामराम, काँग्रेसच्या गडाला आणखी किती भेगा ?
Continues below advertisement
Special Report Congress : अशोक चव्हाणांचा काँग्रेसला रामराम, काँग्रेसच्या गडाला आणखी किती भेगा ?
२० जून २०२२ आणि २ जुलै २०२३... या दोन तारखा महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही... पण आता आणखी एक तारीख महाराष्ट्राला कायम लक्षात ठेवावी लागणार आहे... आणि ती तारीख आहे १२ फेब्रुवारी २०२४... कारण, तीन तारखा, तीन पक्ष आणि तीन दिग्गज नेते... पहिले एकनाथ शिंदे, दुसरे अजित पवार आणि आता अशोक चव्हाण... अर्थात, अशोक चव्हाणांच्या बंडाचं स्वरूप थोडं वेगळं असलं तरी, आधीच निराशेच्या गर्तेत अडकलेल्या, काँग्रेसच्या बुरूजाला मात्र मोठा सुरूंग लावला गेलाय. त्यामुळे, चव्हाणांसोबत आणखी कोणते नेते फुटतील आणि काँग्रेसच्या गडाला आणखी किती भेगा पडतील? असे प्रश्न आता विचारले जातायत... पाहूयात, याच प्रश्नांचा धांडोळा घेणारा एक स्पेशल रिपोर्ट...
Continues below advertisement