Special Report Beed Drone : बीडमधल्या अनेक गावांत 'ड्रोन'ची नजर, परिसरात दहशतीचं वातावरण

Special Report Beed Drone : बीडमधल्या अनेक गावांत 'ड्रोन'ची नजर, परिसरात दहशतीचं वातावरण

 बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात रात्रीच्या सुमारास गिरट्या घालणाऱ्या ड्रोनमुळे दहशत; पोलिसांचा तपास सुरू अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन   याच अनुषंगाने बीड पोलिसांनी तपास सुरू केलाय. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी पत्रकार परिषद घेऊन नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलंय.   जिल्ह्यातील बीड, गेवराई, माजलगाव, धारूर, वडवणी शिरूरसह इतर तालुक्यात ड्रोन उडवले जात आहेत.  यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.  यावर पत्रकार परिषद घेऊन पोलीस अधीक्षकांनी खुलासा केलाय.   चोरट्यांचा आणि या ड्रोनचा काही संबंध नसल्याचं स्पष्ट केले.  त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.  हे ड्रोन कोणाचे आहेत? कशासाठी उडवले जात आहेत?  याबाबत लवकरच खुलासा केला जाईल अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola