ABP News

Aurangzeb kabar Controversy : औरंगजेबच्या कबरीचं राजकारण नेमकं काय? A टू Z कहाणी Special Report

Continues below advertisement

Special Report Aurangjeb Kabar : औरंगजेबाच्या कबरीवरुन राजकीय घमासान, राऊतांचं सरकारला आव्हान

औरंगजेबाची कबर काढून टाका' या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलासह हिंदूत्ववादी संघटना आज प्रचंड आक्रमक झाल्याचे चित्र आहे. राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात आली. कबर उखडून टाकण्याचा इशारा देण्यात येत असताना पुरातत्त्व विभागाने औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण दिल्याने राज्य सरकारला संरक्षण द्यावं लागत असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. औरंगजेबाचे उदात्तीकरण चालणार नसल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलं. दरम्यान औरंगजेबाची कबर हटवा हे जे आंदोलन करत आहेत ही नौटंकी आहे. केंद्र सरकार तुमचं आहे, राज्य सरकार तुमचं आहे. प्रशासन तुमचं आहे. मोदी यांनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा आणि कबर हटवावी असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केलाय.  ही कबर हटवल्यानंतर तिथे बोर्ड लावावा की जो कोणी महाराष्ट्रावर चाल करून येईल ते औरंगजेब असो किंवा भाजप असो त्यांचं असं होईल असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram