Rohit Pawar : येत्या काळात सर्वांना गोड बातमी नक्की मिळेल, दक्षिण अहमदनगर लोकसभेवरुन सूचक वक्तव्य
abp majha web team
Updated at:
16 Jan 2024 09:58 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु आहे. भाजप खासदार सुजय विखेंनी मतदारसंघाचे दौरे वाढवले आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून अद्याप आपला उमेदवार कोण असेल हेच निश्चित झालेलं नाही.भाजप खासदार सुजय विखेंविरोधात कधी सुप्रिया सुळे तर कधी आमदार रोहित पवार यांच्या नावाची चर्चा सुरु असते. मात्र कर्जत-जामखेडच्या लोकांनी जे प्रेम मला दिलंय, त्यामुळे मी पुन्हा विधानसभाच लढवणार असल्याचे म्हणत नगर दक्षिण लोकसभा उमेदवार कोण असेल याची लवकरच गोड बातमी देऊ असं सूचक वक्तव्य रोहित पवारांनी केलंय.