Sonia Gandhi : सोनिया गांधी राज्यसभा निवडणूक लढवणार, निवडणूकीचा भरला अर्ज :ABP Majha
abp majha web team
Updated at:
14 Feb 2024 02:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी यंदा लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्या राज्यसभेवर जाणार आहेत. त्यासाठी त्यांनी आज राजस्थानमधून उमेदवारी अर्ज भरला आहे. रायबरेली या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून प्रियांका गांधींना उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा सुरू झाली आहे. खरंतर, सोनिया कर्नाटक किंवा तेलंगणातून देखील निवडणूक लढवू शकल्या असत्या. मात्र राहुल गांधी दक्षिण भारतातूनच लोकसभेवर निवडून गेलेत. त्यामुळे गांधी घराण्यानं उत्तर भारतातून निवडणूक न लढण्याचं ठरवलंय, असा संदेश जनतेत गेला असता. म्हणून सोनिया राजस्थानमधून उभ्या राहत असल्याचं बोललं जात आहे.