Solar Energy Park : राज्यात सौरऊर्जा पार्क उभारणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Mumbai :  राज्यात सौरऊर्जा पार्क Solar Energy Park उभारण्यासाठी महानिर्मितीच्या एनटीपीसीसह कंपनी स्थापण्यास मान्यता देण्यात आली आहे. आजच्या  मंत्रिमंडळ  बैठकीत  हा निर्णय घेण्यात आला आहे. 

राज्यात 2500 मेगावॅट क्षमतेपर्यंतचे अल्ट्रामेगा  सौर ऊर्जा पार्क विकसित करण्याकरता नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी (महानिर्मिती) 50:50 या प्रमाणात गुंतवणूक करणार आहे.   ही संयुक्त  कंपनी राज्यात 2500 मेगावॅट क्षमतेपर्यंत अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क विकसित करणार आहे.  त्यासाठी राज्य शासनाच्या ऊर्जा विभागास राज्य सुकाणू अभिकरण  म्हणून घोषित करण्यात आले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola