Solapur : सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर आणि सोलापूर-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस आजपासून पुर्ववत
सोलापूर-पुणे प्रवास रेल्वेने करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस, सोलापूर-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस या 2 महत्वाच्या गाड्या आजपासून पुन्हा सुरु होत आहेत. यासह जवळपास १५ इतर गाड्याही पुन्हा एकदा सुरु होत असून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे वाहतूक पूर्ववत झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणारे आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दुहेरीकरणाचं काम आता अंतिम टप्प्यात आला आहे. या कामाची रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी पाहणी करून निरीक्षण केलं आहे आणि या मार्गावरच्या गाड्या आता पुन्हा सुरु होत असल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणारे आहे.
Tags :
Mumbai Pune Solapur Siddheshwar Express Hutatma Express Solapur - Mumbai Solapur - Pune Solapur - Mumbai Siddheshwar Express Solapur Pune - Hutatma Express