Solapur : तडीपार व्यक्तीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला, 3 महिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल
सोलापुरात एका तडीपार व्यक्तीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना घडलेय. सचिन शिंदे या आरोपीला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलंय. मात्र तरीही तो शहरातल्या एका मिरवणुकीत आल्याची माहित पोलिसांनी मिळाली. मिरवणुकीतून या आरोपीला पोलीसांनी पकडलं मात्र त्याला घेऊन जाताना त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर हल्ला केला. या प्रकरणात पोलिसांनी 3 महिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केलाय.