नाच रे मोरा... सोलापुरातील केगाव परिसरात पिसारा फुलवत मोर नाचला, विहंगम दृश्य

सोलापुरात काल रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. मागील काही दिवसांपासून शहरात पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळा सुरू झाला की आनंदाने पिसारा फुलवून नाचणारा मोर पाहण्याचा अनुभव सुखावणारा असतो. अशीच नयमरम्य दृश्य आता आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. सोलापुरातील केगाव परिसरात असलेल्या पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये पावसामुळे निसर्ग बहरलेला आहे. या ठिकाणी अनेक पशु पक्षी आनंदाने मुक्त संचार करत असतात. याच परिसरात मोर पिसारा फुलवत असल्याचे विलोभनीय दृश्य टिपले आहेत पोलीस कॉन्स्टेबल अकबर शेख यांनी. अकबर शेख हे सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. फोटोग्राफीची आवड असल्याने केंद्रातील अनेक पशु पक्षांचे छायाचित्रे त्यांनी काढली आहेत. पावसाळी वातावरणात 'मयूरवैभव' देखील त्यांनी टिपले आहे. नयनरम्य दृश्य एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola