Solapur | नान्नज माळढोक अभयारण्यात आग, 20 ते 25 हेक्टरवरील गवत जळून खाक; 4 तासांनंतर आग आटोक्यात
आफताब शेख, एबीपी माझा
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सोलापुरातील नान्नज माळढोक अभयारण्यात आगीमुळं जवळपास 20 ते 25 हेक्टर क्षेत्रातील गवत जळून खाक झालंय. अभयारण्य परिसरात दुपारपासून जोरात वारा सुरू होता. त्यामुळे विद्युत तारांचे एकमेकांना घर्षण होऊन ठिणगी पडून आग लागली असल्याची शक्यता वनपाल गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केली. सुमारे 4 तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. यामध्ये कोणत्याही प्राण्याच्या जीवाला हानी झाल्याच समोर आलेलं नाही.