Solapur Market Yardसोलापूर बाजारपेठेत घाणीचे साम्राज्य;शेतकरी, व्यापाऱ्यांच्या मालाचे नुकसान
abp majha web team
Updated at:
25 Aug 2024 05:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात कांद्याच्या बाजारासाठी सर्वात प्रसिद्ध बाजारपेठ पैकी एक बाजारपेठ म्हणून सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. कोट्यावधी रुपयांची उलाढाल सोलापूरच्या बाजारात होते. बाजार समितीला मूलभूत सुविधासाठी मोठी फी देखील दिली जाते. मात्र या बाजरात अक्षरशः घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ठिकठिकाणी खड्डे, त्यात साचलेले पावसाचे पाणी यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतय. बाजार समितीची अवस्था कशी आहे? व्यापारी आणि शेतकऱ्यांना कसा त्रास होतो जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी