Solapur Jhund: 'झुंड'ला सोलापूरच्या कलाकाराकडून अनोख्या शुभेच्छा ABP Majha

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा बहुचर्चित चित्रपट झुंडचं अनेकांकडून कौतुक होतय. या चित्रपटला सोलापुरातील कलाकारांनी अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. सोलापुरातील चित्रकार प्रतिक तांदळे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तुरीच्या भुसकटचा वापर करत झुंडची भव्य प्रतिमा साकारली आहे. जवळपास 35 फूट बाय 50 फूट एवढी आकराची ही प्रतिमा बनवली आहे. ही प्रतिमा  साकरण्यासाठी 2 दिवसाचा कालावधी लागलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola