IND vs UAE Asia Cup | दुबईच्या मैदानात टीम इंडियाचा यूएईवर दणदणीत विजय
भारताने UAE वर नऊ विकेट्स आणि तब्बल त्र्याण्णव चेंडू राखून विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने Asia Cup मोहिमेची दणक्यात सुरुवात केली. Kuldeep Yadav आणि Shivam Dube यांच्या प्रभावी माऱ्यासमोर UAE चा डाव अवघ्या सत्तावन्न धावात आटोपला. Kuldeep ने चार तर Dube ने तीन विकेट्स घेतल्या. याशिवाय Jasprit Bumrah, Axar Patel आणि Varun Chakravarthy यांनी प्रत्येकी एक विकेट घेतले. त्यानंतर अठ्ठावन्न धावांचे सोपे आव्हान भारताने अवघ्या सत्तावीस चेंडूतच पूर्ण केले. सलामीच्या Abhishek Sharma ने तीस तर Shubman Gill ने नाबाद वीस धावांची खेळी केली. भारताने हा सामना एकतर्फी जिंकत स्पर्धेत आपली ताकद दाखवून दिली.