Solapur: कारंबा गावात साडेचार लाखांचा गुटखा जप्त, बंद घरात होता साठा ABP Majha
उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा इथं अवैध गुटखा विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात 4 लाख 65 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अमीर शेख या व्यक्तीने घरात गुटख्याचा अवैध साठा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. घरातील भिंतीमध्ये मोठे कप्पे करुन गुटख्याची पोती लपवून ठेवण्यात आली होती.या कारवाई दरम्यान गुटखा विक्रेता पळून गेला. तर एजंट म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीस पोलिसांनी अटक केली.