Solapur Flood : 'दिवाळी कीटवर भागवतोय, पण जनावरं काय खाणार?', पूरग्रस्त शेतकऱ्याचा संतप्त सवाल
Continues below advertisement
सोलापूरमधील (Solapur) सीना (Sina) नदीला आलेल्या पुराला महिना उलटून गेल्यानंतरही अनेक गावांमधील नागरिक अंधारात आहेत. या भागातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा 'ABP माझा'चे प्रतिनिधी आफताब शेख (Aftab Shaikh) यांनी मांडल्या आहेत. 'सरकारने दिलेले दहा हजार रुपये जेनरेटरच्या भाड्याला आणि डिझेललाच खर्च झाले आहेत, त्यात आम्ही काय दिवाळी करायची?' असा सवाल येथील शेतकऱ्यांनी केला आहे. सीना (Sina) नदीच्या पुराने बाधित झालेल्या तिर्हे पाथरीसारख्या गावांमध्ये महिना उलटूनही वीजपुरवठा खंडित आहे. त्यामुळे येथील शेतकरी जेनरेटर लावून दिवाळीचा आकाशकंदील लावत आहेत. शासनाकडून मिळालेली मदत अपुरी पडत असून, जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दिवाळीच्या किटमधील वस्तूंवर सण साजरा करण्याची वेळ आली असली, तरी घरात आणि गुरांच्या गोठ्यात अंधार असल्याने साप-किटकांची भीती कायम आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement