Navi Mumbai Fire: वाशीतील 'रहेजा रेसिडेन्सी'मध्ये अग्नितांडव, एकाच कुटुंबातील तिघांसह चौघांचा होरपळून मृत्यू
Continues below advertisement
नवी मुंबईतील वाशीच्या सेक्टर १४ (Sector 14) येथील एमजी कॉम्प्लेक्समधील (MG Complex) रहेजा रेसिडन्सी (Raheja Residency) या इमारतीत मध्यरात्री भीषण आग लागली. या अग्नितांडवात एका सहा वर्षांच्या मुलीसह एकूण चार जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे दहा जण जखमी झाले आहेत. आगीची ही दुर्दैवी घटना मध्यरात्री सुमारे १२ वाजून ४० मिनिटांनी घडली, ज्यात इमारतीच्या १०व्या मजल्यावर आग लागून ती ११व्या आणि १२व्या मजल्यापर्यंत पसरली. या आगीमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश असून, मृतांमध्ये वेदिका सुंदर बालकृष्णन (६), कमला हिरालाल जैन (८४), सुंदर बालकृष्णन (४४) आणि पूजा राजन (३९) यांचा समावेश आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आणि काही तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. जखमींना जवळच्या फोर्टिस आणि एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, आणि पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement