Solapur Bhondubaba: गुप्तधनासाठी कोट्यवधींची फसवणूक, 1 कोटी 87 लाखांचा गंडा, भोंदूबाबा अखेर अटकेत

Continues below advertisement
सोलापूरमध्ये (Solapur) घडलेल्या दोन मोठ्या गुन्हेगारी घटनांनी खळबळ उडाली आहे. वाढदिवसाला तलवारीने केक (Cake) कापणाऱ्या विजय साठे (Vijay Sathe) आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे, तर दुसरीकडे कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे. 'जमिनीतून गुप्तधनाचा हंडा काढून देतो,' असं सांगून मोहम्मद कादर शेख (Mohammad Qadar Shaikh) नावाच्या भोंदूबाबानं तब्बल एक कोटी सत्त्याऐंशी लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला कर्नाटकातील विजापूर (Vijayapura) येथून अटक केली आहे. सोलापूरमधील साठे वस्ती परिसरात विजय साठे आणि त्याच्या सात साथीदारांनी तलवारीने केक कापून दहशत निर्माण केल्याप्रकरणी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय, बेळगावमध्ये (Belgaum) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे प्रियकरासोबत पळून गेलेल्या तरुणीचे तिच्याच कुटुंबीयांनी श्राद्ध घातले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola