Eknath Shinde BMC Polls: महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंचा कानमंत्र, पदाधिकाऱ्यांना सूचना

Continues below advertisement
मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रभागनिहाय आढावा घेतला असून पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. 'कोणतेही हेवेदावे ठेवू नका, सहकारी म्हणून काम करा, लोकांपर्यंत पोहोचा आणि जे काम केले ते सांगा,' अशा स्पष्ट सूचना एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीत त्यांनी आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर भर दिला. मतदार यादीवर बारकाईने काम करून लोकांच्या संपर्कात राहण्याचे आदेशही त्यांनी दिले. मुंबईतील विकासकामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून पक्षाची प्रतिमा मजबूत करण्यावर शिंदे यांनी जोर दिला. महायुती म्हणून एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचे संकेतही यातून मिळत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola