Solapur : माकपच्या विडी कामगार आंदोलनाला महिलांची तुफान गर्दी
विडी कामगारांचा रोजी रोटीचा विचार करून शासनामार्फत उच्च न्यायालयात सकारात्मक बाजु भक्कमपणे मांडावी या मागणीसाठी सोलापुरात आंदोलन पुकारण्यात आले आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सिटू आणि लाल बावटा विडी कामगार संघटनेच्यावतीने हे आंदोलन पुकारण्यात आलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना या आंदोलनाला परवानगी नाकारलेली होती, मात्र हजारोंच्या संख्येने महिला विडी कामगार या आंदोलनाला एकत्रित जमल्या. उच्च न्यायालयात स्नेहा मार्जाडी यांनी धु्म्रपानामुळे कोरोना होतो असा दावा करत जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आतापर्यंत पाच वेळा सुनावणी देखील झाली आहे. 25 जून ला या याचिकेवर अंतिम निर्णय येणे अपेक्षित आहेत. त्या आधी राज्य सरकारला आपली बाजू मांडणारे पत्रिज्ञापत्र सादर करायचे आहे. राज्य सरकारने राज्यातील जवळपास 3 लाख महिला विडी कामगारांचा विचार करुन बाजू मांडावी. शासन एकीकडे दारु विक्रीला परवानगी देत आहे दुसरीकडे विडी कामगार महिलांवर अन्याय का असा सवाल आंदोलनावेळी माजी आमदार नरसय्या आडम यांनी विचारला