Solapur Corona | बार्शीतील रुग्णालयात तीन कोरोनाबाधितांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू , कुटुंबीयांचा आरोप
Continues below advertisement
सोलापुरातील बार्शीमध्ये असलेल्या नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर रुग्णालयात तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. तर प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी मात्र आरोप फेटाळले आहेत. रुग्णांची तब्येत आधीपासून खालावली होती, त्यांचा मृत्यू ऑक्सिजन अभावी झालेला नाही, अशी माहिती हेमंत निकम यांनी एबीपी माझाला फोनवरुन दिली. दुसरीकडे यासंबंधी माहिती घेण्यासाठी गेलेल्या तहसीलदार सुनील शेरखाने यांना मात्र कोणतीही माहिती देण्यात आली नाही. रुग्णालय प्रशासनाला पत्र लिहून मृतांचा अहवाल मागवणार असल्याचं तहसीलदार सुनील शेरखाने यांनी सांगितलं
Continues below advertisement