कित्येक वर्षांपासून सोलापूर-बार्शी राज्य मार्गावर खड्डेच खड्डे, नागरिक हैराण

Continues below advertisement
गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर-बार्शी राज्य मार्गावर खड्डे पडले आहेत. जवळपास 10 वर्षांपासून चाळण झालेल्या या रस्त्याचे काम मागील वर्षभरापासून सुरू आहे. मात्र अद्याप रोडचे काम पूर्ण नाहीये. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या हजारोंच्या नशिबात अजून ही खड्डेच खड्डेच आहेत. दररोज बार्शी सोलापूर प्रवास करणारे प्रवाशांना खड्डे चुकवत-चुकवत जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. 10 वर्ष रस्त्यावर खड्डे असताना देखील याचे काम मागच्या वर्षी सुरू झालं आहे. नवीन रस्ता हा 10 मीटर रुंदीचा होणार असून जवळपास 160 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तर पुढील मार्च पर्यंत रोडचे काम होणे अपेक्षित आहे. या रस्त्यावर टोल जरी घेतले जाणार नसले तरी सामन्यांच्या करातून रस्त्याच्या देखभालीसाठी पैसे घेतलेच जातात. त्यामुळे दहा वर्षे रस्त्याची देखभाल का केली गेली नाही हा ही प्रश्न आहे. या दहा वर्षांत अनेकांना जीव गमावावा लागला, पाठीचे त्रास, गाड्यांची अवस्था तर विचारूच नका. याच सोलापूर-बार्शी मार्गावरील कारंबा गावाजवळील खड्डेमय रस्त्याची परिस्थिती कशी आहे सांगतोय आमचा प्रतिनिधी आफताब शेख
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram