Balaji Amines | सोलापूरच्या शिरपेचात आणखी एक तुरा! फोर्ब्सच्या यादीत बालाजी अमाईन्सचं नाव

फोर्ब्सने 2021 मधील सर्वोत्तम भारतीय कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. यादीत भारतातल्या 26 नामांकित कंपन्या आहेत. त्यात सोलापूरच्या बालाजी अमाईन्सचाही समावेश आहे. बालाजी अमाईन्स या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. बालाजी अमाईन्सची कोविड उपचारासाठी रेमडिसवीरचा घटक तयार करणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांपैकी एक. म्हणून कंपनीची मोठी चर्चा झाली. विविध रासायनिक उत्पादने तयार करणाऱ्या बालाजी अमाईन्सची वार्षिक उलाढाल 10 हजार 652 कोटी रुपये आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola