Solapur Anganwadi Sevika : अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ होणार ?
Solapur Anganwadi Sevika : अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ होणार ? गेल्या अनेक महिन्यांपासून अंगणवाडी सेविका वाढीव मानधनासाठी आंदोलन करतायत.. त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पाकडून या अंगणवाडी सेविकांच्या काय अपेक्षा आहेत. पाहूया... राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही महत्त्वाच्या योजनांची माहिती 'एबीपी माझा'कडे आली आहे. या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्र्यांच्या योजनांची छाप आहे. आज (28 जून) दुपारी अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प सादर करतील. आगमी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर हा अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्याने यामध्ये मोठ्या योजनांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण, युवा कौशल्य, अन्नपूर्णा योजना अशा महत्वााचा योजनांची घोषणा या अर्थसंकल्पात केली जाऊ शकते. अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून सर्व महिलांना दरवर्षी तीन सिलिंडर मोफत मिळणार आहेत.