Solapur Airportसाठी आवश्यक असलेल्या जमिनीचा प्रस्ताव वनविभागानं फेटाळला ABP Majha
सोलापूरच्या विमानसेवेला आता आणखी एक अडथळा आलाय. प्रस्तावित बोरामणी विमानतळासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचा प्रस्ताव वनविभागाने फेटाळला आहे. सोलापुरात नव्याने होऊ घातलेल्या बोरामणी विमानतळासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. जवळपास 573 हेक्टरचे भूसंपादन झाले आहे. मात्र नियोजित विमानतळाच्या आराखड्यात वनविभागाची देखील जवळपास 33.72 हेक्टर जमीन आहे. विशेष म्हणजे दुर्मिळ माळढोक अभयारण्याची ही जमीन आहे. या राखीव वनजमिनीच्या निर्वनीकरणाचा प्रस्ताव वनविभागाकडे पाठवण्यात आलेला होता. मात्र वनखात्याच्या प्रादेशिक अधिकार समितीने (आरईसी-रिजनल ईम्पॉवर्ड कमिटी) निर्वनीकरणाचा प्रस्ताव फेटाळला आहे. तसेच माळढोक नामशेष होत असल्याने त्याचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे मत समितीने व्यक्त केले आहे. त्यामुळे आधीपासून असलेल्या होटगी रोड विमानतळाच्या सेवेत सहकारी साखर कारखान्याची चिमणी अडथळा ठरतेय. तर दुसरीकडे प्रस्तावित बोरामणी विमानसेवेत माळढोकमुळे अडथळा निर्माण होतोय. त्यामूळे सोलापूर करांच्या विमानसेवेचे स्वप्न कधी पूर्ण होणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय.