Solapur Lockdown | सोलापूरात आजपासून 10 दिवस लॉकडाऊन; कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय
सोलापुरात दिवसेंदिवस कोरोनाबधितांची संख्या वाढत आहे. सोलापुरातील ही वाढती रुग्णसंख्या पाहता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. 26 जुलैपर्यंत 10 दिवस हा लॉकडाऊन लागू असणार आहे. सोलापूर शहर आणि आजूबाजूच्या तालुक्यातील जवळपास 31 गावांमध्ये हा लॉकडाऊन लागू असेल. या दरम्यान दूध, मेडिकल, रुग्णालय या व्यतिरिक्त सर्व आस्थापना बंद असणार आहेत. अनलॉकच्या कालावधीत ज्या बाजारपेठा सुरू करण्यात आलेल्या होत्या. त्या सर्व बाजारपेठा 10 दिवस बंद असणार आहेत.