Social Media Post | पुणे जिल्ह्यातील यवतमध्ये तणाव, घर पेटवले
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात तणावाची स्थिती निर्माण झाली. एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने दुपारी बारा वाजल्यानंतर दोन गट आमनेसामने आले. या घटनेनंतर काही ठिकाणी तोडफोड करण्याचा प्रयत्न झाला. पत्र्याचे शेड आणि एका वाहनाचे नुकसान झाले. ज्या व्यक्तीने पोस्ट केली होती, त्याच्या घराला जमावाने आग लावली. घरातून अजूनही धूर निघत होता. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आला. पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी माध्यमांना माहिती दिली. सध्या गावात शांतता असून, कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनावर विश्वास ठेवावा असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. पोस्ट करणारी व्यक्ती स्थानिक नसल्याचे समोर आले असून, याबाबत अधिक तपास सुरू आहे. नागरिकांनी शांतता राखावी आणि कायदा हातात घेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.