Yavat Violence | यवतमध्ये तणाव, जाळपोळ, दगडफेक; यवतमध्ये तणावपूर्ण परिस्थितीचे संपूर्ण अपडेट्स
दौंड तालुक्यातील यवत गावात सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे तणाव निर्माण झाला आहे. दुपारी १२ नंतर दोन गट आमनेसामने आले. यवतमध्ये आठवडे बाजार बंद करण्यात आला असून, काही दुचाकी गाड्या पेटवून देण्यात आल्या. दगडफेकीच्या घटनाही घडल्या. पोलिसांनी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. ही व्यक्ती स्थानिक नसून बाहेरगावची आहे. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. २६ जुलैपासून या भागात तणाव होता, मात्र आज त्याचा उद्रेक झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे. राजकीय नेत्यांनी शांततेचे आवाहन केले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी 'शांतता शांतता शांतता आपण चर्चेतून मार्ग काढू' असे आवाहन केले. पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.