Snake Catcher Arrested : नागासोबत केला स्टंट, सांगली वन विभागाने घेतलं ताब्यात

नागासोबत जीवघेणे  व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या  तरुणाला हा स्टंट चांगलाच महागात पडलाय. सांगली वन विभागाने या तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. प्रदीप अडसुळे असं या 22 वर्षीय तरुणाचं नाव आहे. नागाला पकडून त्याच्या सोबत अनेक व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर तो व्हायरल करत होता. अखेरीस वन विभागाने वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola