Snake : सापासोबत खेळणं पडलं महागात, काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगा तीन कोब्रांसमोर बसलेला दिसत आहे. या तिन्ही सापांना फणा पसरवला आहे. तर दुसरीकडे तो एका सापाला पडकण्याचा प्रयत्न करत आहे. तिन्ही साप एकाच स्टाईलमध्ये बसल्याचे पाहिल्यानंतर तो मुलगा त्याचे हात आणि पाय हलवू लागतो. ते पाहिल्यानंतर सापही ते कॉपी करू लागतात. याच दरम्यान, एक साप त्या मुलाच्या गुडघ्याला चावा घेतो. तर तो मुलगा स्वत:ला वाचवण्यासाठी लगेच त्या सापाला पकडतो.