Smita Patil On Ajit Pawar : आबांबद्दल अजित पवार असं वक्तव्य करतील असं वाटलं नव्हतं

Smita Patil On Ajit Pawar : आबांबद्दल अजित पवार असं वक्तव्य करतील असं वाटलं नव्हतं

अजित दादांमध्ये आम्ही आमच्या आर आर आबांना पाहतो. अशावेळी आबा हयात नसताना वडीलधाऱ्या दादांनी केलेल्या वक्तव्यामुळं अतीव दुःख झालं. असं म्हणत आबांची कन्या स्मिता पाटलांनी वडीलधाऱ्या दादांकडे यापुढं काही अपेक्षा बाळगल्यात. दादांनी आमचं पालकत्व स्वीकारल्यानं ते आम्हाला आबांसारखे आहेत. त्यामुळं ते असं वक्तव्य करतील याचा आम्ही कधीचं विचार केला नव्हता. मात्र वडीलधाऱ्या दादांचा यामागे काय हेतू होता, हे मी त्यांना मुळीच विचारू शकत नाही. पण यापुढं ते त्यांच्या मुलासमान असणाऱ्या रोहित पाटलांच्या विरोधात तासगाव मध्ये येऊन जेंव्हा प्रचार करतील, त्यावेळी त्यांनी आरोप-प्रत्यारोप नक्कीचं करावेत. पण त्या आरोपांचं खंडन करणारी व्यक्ती हयात आहे की नाही, याची खबरदारी घ्यावी आणि त्या सोबतचं तथ्य असणारेचं आरोप त्यांनी करावेत. अशी विनंती स्मिता पाटलांनी वडीलधाऱ्या दादांना केली. त्यांच्याशी संवाद साधलाय नाजिम मुल्ला यांनी.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola