Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 30 सप्टेंबर 2020 | बुधवार | ABP Majha

1. बाबरी मशिद प्रकरणाचा आज निकाल, लखनौचं विशेष सीबीआय न्यायालय फैसला सुनावणार; अडवाणी, जोशी, उमाभारतींसह 32 जणांचं भवितव्य ठरणार

2. अयोध्येनंतर मथुरेत नवा संघर्ष सुरु होण्याची शक्यता, कृष्ण मंदिराजवळची मशिद हटवण्याची मागणी, श्रीकृष्ण विराजमानच्या याचिकेबाबत आज सुनावणी

3. बिहार निवडणुकीसाठी सुशांत प्रकरणाचा वापर, एम्सच्या अहवालानंतर गृहमंत्री अनिल देशमुखांची आगपाखड, महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांची बदनामी केल्याचा आरोप

4. ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूड सुपरस्टार्सच्या नावाची पहिली अक्षरं समोर; एस, ए आणि आर अद्याक्षरं असलेली नावं एनसीबीच्या रडारवर, लवकरच चौकशीची शक्यता

5. आर्थिक दुर्बल घटकांत मराठा समाजाच्या समावेश नको, खासदार संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत भूमिका, जीआर मागे घेण्याचं उद्धव ठाकरेंचं आश्वासन

6. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना फटका, औरंगाबाद, नागपूर, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

7. नवरात्रौत्सव साधेपणाने साजरा करा; गरबा, दांडिया खेळण्यास बंदी, तर विनामास्क बेस्ट, टॅक्सी, रिक्षात प्रवेश नाही; मुंबई महापालिका आयुक्तांचे आदेश

8. सुशांत सिंह आता हयात नाही, मग तो ड्रग्ज कुणाकडनं घेत होता, हे कसं सिद्ध करणार?, मुंबई हायकोर्टाचा सवाल

9. अद्यापही लक्षणीय लोकसंख्येला कोरोना व्हायरस संसर्गाचा अधिक धोका, सेरो सर्वे अहवालातून उघड, भारतातील 21 राज्यांमधील 70 जिल्ह्यांमध्ये करण्यात आला सर्व्हे

10. दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या सामन्यात हैदराबादचा पहिला विजय, राशिदच्या फिरकीपुढे हतबल दिल्लीचा 15 धावांनी पराभव

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola