Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 22 जानेवारी 2022 : शनिवार : ABP Majha
1. शाळांपाठोपाठ आता राज्यातली महाविद्यालयेही सुरु होण्याची शक्यता, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव
2. मार्चमध्ये मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह 14 पालिका निवडणुकांची शक्यता, तर मुंबईच्या वॉर्ड पुनर्रचनेचा आराखडाही सादर
3. गोवा विधानसभा निवडणुकीआधी राजकीय भूकंप, उत्पल पर्रिकर यांचा भाजपला रामराम, अपक्ष म्हणून निवडणूक लढणार
4. मुंबईत ताडदेव भाटिया रुग्णालयाच्या बाजूच्या इमारतीमध्ये आग; दोन जण जखमी
5. कोरोना होऊन गेल्यानंतरही खोकला दोन आठवडे असेल तर टीबी होण्याची शक्यता, टीबी होऊ नये म्हणून खबरदारी घेण्याचा केंद्राचा सल्ला
6. आरोपांमुळे सरकारी नोकरी सोडण्याच्या मनस्थितीत, ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसलेंची माझावर उद्विग्न प्रतिक्रिया
7. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचं निधन, वयाच्या सत्तराव्या वर्षी पुण्यातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8. रिलायन्सचा तिमाहीचा अहवाल प्रकाशित, निव्वळ नफा 18,589 कोटी रुपये, कंपनीच्या नफ्यात 41 टक्क्यांची वाढ
9. अभिनेत्री प्रियंका चोप्रा बनली आई, सरोगसीच्या माध्यमातून बाळाला जन्म दिल्याची देसी गर्लची पोस्ट, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
10. कसोटी मालिकेतील पराभवानंतर एकदिवसीय मालिकाही भारताने गमावली, दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 गडी राखून विजय