Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 16 ऑक्टोबर 2021 शनिवार : ABP Majha

Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 16 ऑक्टोबर 2021 शनिवार : ABP Majha

महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.

 

  1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात, फडणवीस आणि मोदींवरही निशाणा, ड्रग्ज प्रकरणावरुन केंद्र सरकारला खडेबोल, भाजपकडून प्रत्युत्तर

  2. दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंनी स्वपक्षातील नेत्यांनाच सुनावलं, पंकजा नेमक्या कुठल्या पक्षात, धनंजय मुंडेंचा सवाल

  3. राज ठाकरेंसाठी भाजपची बॅटिंग, प्रबोधनकार ग्रंथ प्रकाशन सोहळ्यासाठी राज ठाकरेंना निमंत्रित करा, आशिष शेलारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

  4. आरोग्य खात्याच्या परीक्षेचा सावळागोंधळ सुरुच, एकाच दिवशीच्या २ परीक्षांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षाकेंद्र, उमेदवार अडचणीत

  5. मुंबई, पुणे, बारामतीसह ७० ठिकाणी केलेल्या आयकर छापेमारीत तब्बल १८४ कोटींची बेहिशोबी मालमत्ता उघड, २ बांधकाम व्यावसायिक समूहांशी संबंधित कारवाई

  6. भिवंडीतील चामुंडा कंपाऊंड परिसरातील आग आटोक्यात, २० ते २५ दुकानांचं नुकसान, ठाणे-भिवंडीतल्या अग्निशमनच्या प्रयत्नांना यश

  7. अफगाणिस्तानमधील मशिदीत पुन्हा बॉम्बस्फोट, 32 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू, आठवड्याभरातील दुसरी घटना

  8. धोनीची चेन्नईच ठरली सुपरकिंग, चौथ्यांदा पटकावलं आयपीएलचं जेतेपद, चुरशीच्या सामन्यात कोलकात्यावर मात

  9. टीम इंडियाचा कोच होण्यास राहुल द्रविड तयार, 2023 पर्यंत होऊ शकतो करार, सूत्रांची माहिती

  10. भारत 17 वर्षानंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, आशिया कपचे यजमानपद पाकिस्तान क्रिकेट ब्युरोकडे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola