SL Bhyrappa Passes Away | ज्येष्ठ कन्नड साहित्यिक, पद्मभूषण SL Bhyrappa यांचे निधन
Continues below advertisement
ज्येष्ठ कन्नड साहित्यिक आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित एस एल भैरप्पा यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या चौऱ्याण्णव व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. भैरप्पा हे आधुनिक कन्नड साहित्यातील एक महत्त्वाचे नाव होते. त्यांच्या साहित्यकृतींनी भारतीय साहित्यात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या आवरणतंतू, पर्व, मंद्र, तडा, वंशवृक्ष, परिशोध, उत्तरकांड, साक्षी, पारखा काठ यांसारख्या अनेक कादंबऱ्या बहुतांश भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत. त्यांच्या लेखनाने अनेक पिढ्यांना विचार करण्यास, प्रश्न विचारण्यास आणि समाजाशी अधिक सखोलपणे जोडले जाण्यास प्रेरणा दिली. साहित्यक्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र बोदींनी शोक व्यक्त केला. पंतप्रधानांनी म्हटले, "S.L. Bhyrappa यांच्या निधनाने आपण एक महान व्यक्तिमत्व गमावले आहे, ज्यांनी आपल्या विवेकबुद्धीला जागृत केले आणि भारताच्या आत्म्यात खोलवर प्रवेश केला. एक निर्भय आणि कालातीत विचारवंत म्हणून, त्यांनी त्यांच्या विचारप्रवर्तक कृतींनी कन्नड साहित्याला समृद्ध केले." त्यांच्या निधनाने साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement