Yavatmal Tree Festival: 1957 साली लावलेल्या झाडांची पुजा, वड, पिंपळ वृक्षाचा पासष्टी सोहळा ABP Majha
Continues below advertisement
यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसदमध्ये चक्क २ झाडांचा पासष्टी सोहळा साजरा करण्यात आला. तुकामाई महाराज मंदिरात १९५७ साली तत्कालिन पुजारी रामभाऊ भोपी यांनी वड आणि पिंपळाचं रोपटं लावलं होतं. ६५ वर्षानंतर या रोपट्यांच रुपांतर मोठ्या वृक्षांमध्ये झालंय. आजही ही झाडं दिमाखात उभी आहेत. त्यामुळे वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यासाठी उल्हास भोपी यांच्या मार्गदर्शनाखाली हा पासष्टी सोहळा आयोजित करत अन्नदानही करण्यात आलं.
Continues below advertisement