
Sinner Eknath Shinde Speech : रामगिरी महाराजांकडून समाजाला दिशा देण्याचं काम - मुख्यमंत्री शिंदे
Sinner Eknath Shinde Speech : रामगिरी महाराजांकडून समाजाला दिशा देण्याचं काम - मुख्यमंत्री शिंदे
रामगिरी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय.. त्या रामगिरी महाराजांची मुख्यमंत्री शिंदेंनी भेट घेतली.. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात हरिनाम सप्ताह सुरु आहे.. या सप्ताहात मुख्यमंत्री शिंदे, गिरीश महाजन आणि सुजय विखे पाटील यांनी हजेरी लावली..
मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेल्या रामगिरी महाराजांची भेट राज्याचे प्रमुख या नात्यानं मुख्यमंत्र्यांना टाळता आली असती.. पण मुख्यमंत्र्यांनी रामगिरी महाराजांची सिन्नरमध्ये जात भेट घेतली.. एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी रामगिरी महाराजांचा उल्लेख संत असा केला..
दुसरीकडे भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी रामगिरी महाराजांना वाकून नमस्कार केला.. तर सुजय विखे पाटील यांनी रामगिरी महाराजांसमोर साष्टांग दंडवत घातला..