Palak Muchhal: गायिका पलक मुच्छलची विश्वविक्रमी कामगिरी, 3800 मुलांच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी मदत

Continues below advertisement
गायिका पलक मुच्छलने (Palak Muchhal) तिच्या दानशूरतेने एक कौतुकास्पद विश्वविक्रम केला आहे. पलकने तिच्या 'पलक पलाश चॅरिटेबल फाऊंडेशन'च्या (Palak Palash Charitable Foundation) माध्यमातून तब्बल ३८०० मुलांच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी यशस्वीपणे निधी जमा केला आहे. पलकच्या या कार्याची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness Book of World Record) आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (Limca Book of Record) घेण्यात आली आहे, ज्यामुळे तिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. यापूर्वीही पलकने कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आणि गुजरात भूकंपग्रस्तांना दहा लाख रुपयांची मदत करून सामाजिक बांधिलकी जपली होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola