Bihar Politics: 'बाहेरचे उमेदवार नको', Maithili Thakur यांच्या उमेदवारीला भाजपमधूनच तीव्र विरोध

Continues below advertisement
बिहारच्या राजकारणात (Bihar Politics) गायिका मैथिली ठाकूर (Maithili Thakur) यांच्या भाजप (BJP) प्रवेशाने आणि उमेदवारीने मोठी खळबळ उडाली आहे. 'अलीनगरमध्ये बाहेरचे उमेदवार नको' अशी स्पष्ट भूमिका घेत पक्षाच्या सातही मंडळ अध्यक्षांनी मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मैथिली ठाकूर यांना पक्षाने दुसऱ्याच दिवशी दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर (Alinagar) विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. या अनपेक्षित निर्णयामुळे स्थानिक भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी संतप्त झाले असून, त्यांनी मैथिली यांच्याऐवजी स्थानिक नेते संजय सिंह (Sanjay Singh) यांना उमेदवारी देण्याची जोरदार मागणी केली आहे. बाहेरच्या उमेदवाराला कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणार नाही, असा स्पष्ट इशारा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिल्याने भाजपसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola